🚔 ठाणे शहर पोलीसांचा नवा उपक्रम! 🚔 मा. पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते "निर्भय ठाणे" WhatsApp Chat Bot (📲 70394 55555) सेवेचा शुभारंभ ✅ 📌 विविध पोलीस सेवा व उपक्रमांची माहिती आता जलद, सुलभ व पारदर्शक पद्धतीने! रोजी चॅटबॉट २९/०८/२०२५ सुरु केले .

नागरिकांसाठी " निर्भय ठाणे " Whats app Chat Bot संदर्भात प्रभावी अंमलबजावणी
ठाणे शहर पोलीस दल अधिकाधिक जनताभिमुख करण्याच्या उद्देशाने व पोलीसांच्या विविध सेवा/उपक्रम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या दृष्टीने ठाणे शहर पोलीसांचे अधिकृत Twitter, Facebook, Instagram, व Whatsapp चॅनेल इत्यादी सोशल मिडीयाद्वारे प्रभावीपणे वापर सुरू आहे.
ठाणे आयुक्तालयाकडून मोबाईल क्रमांक 70394 55555 या क्रमांकाची "निर्भय ठाणे" Whats app Chat Bot सेवा नागरीकांसाठी आज दिनांक २९/०८/२०२५ रोजी मा. पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आली.