ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेने #CAWSEFoundation च्या सौ. कल्पना व श्री. जितेश मोरे यांच्या सहकार्याने अमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह

ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेने #CAWSEFoundation च्या सौ. कल्पना व श्री. जितेश मोरे यांच्या सहकार्याने अमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह (२३ ते २८ जून २०२५) ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आला. या जनजागृती उपक्रमात विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, मानसिक आरोग्य, राग नियंत्रण, तसेच सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श (Safe & Unsafe Touch) याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये या विषयांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांना 'स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपण्यासाठी सक्षम बनविणे' हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या सप्ताहात सुमारे ३९५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उपक्रमांत * शाळा आणि कॉलेज परिसरात रॅलीज,निबंध स्पर्धा – “व्यसनमुक्त भारतात माझे योगदान” * प्रश्नोत्तर सत्र व समुपदेशन * मोकळ्या गप्पा व संवाद सत्र यांचा समावेश होता. या कार्यक्रमात गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त श्री. विनय घोरपडे, अमली पदार्थ विरोधी कक्षाचे श्री. जगदीश गावित, तसेच कॉज फाऊंडेशनचे संस्थापक सौ. कल्पना व श्री. जितेश मोरे, आणि युवा श्री. रुद्र मोरे यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःहून सहभाग घेऊन विविध विषयांवर विचार मांडले, प्रश्न विचारले आणि अनुभव शेअर करत उपक्रमाला अधिक अर्थपूर्ण बनवले. ठाणे पोलीस आणि कॉज फाऊंडेशन पुढील काळात हा उपक्रम इतर भागातही राबविणारअसून, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात येणार आहे.दरवर्षीप्रमाणे संपूर्ण वर्षभर हा उपक्रम चालू राहणार आहे.अशी माहिती सौ. कल्पना मोरे यांनी दिली असून सर्व शाळांनी व महावियालयानी आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.