परवाना प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत एक खिडकी योजना दि.०७/०४/२०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली.

पोलीस आयुक्त कार्यालयात देण्यात येणाऱ्या नवीन शस्त्र परवाना, परवाना नूतनीकरण, मुदतवाढ, आंतरराज्य परवाना, ज्वलनशील परवाना, ऑकेस्टा व बार परवाना करीता नवीन संगणक प्रणाली कार्यरत. परवाना प्रक्रियेमध्ये सुलभता व एकसूत्रीपणा येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत LICENCE MANAGEMENT SOFTWARE SYSTEM सुरु करण्यात आली आहे. सदर संगणक प्रणाली मार्फत परवानाधारक यांना परवाना नूतनीकरणाबाबत एसएमएस सूविधा उपलब्ध. दि. ०७ एप्रिल २०२५ रोजीपासून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रिपणा व गतिमानता आणण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.